Quote

जगातील गोष्टी पाहाव्यात, ऐकाव्यात आणि “नशिबात नाही” अशी मनाला समजूत घालून विसरून जाव्यात! जग सुंदर आहे कारण ते तुमचं नाही… जगातील अनेक गोष्टी सुंदर आहेत कारण त्या तुमच्या नाहीत!

Mediatech: ४ महिने थोडक्यात

Mediatech… वडाळा येथे असलेलेली छोटीशी web development कंपनी. ऑफिस antop hill warehouse मध्ये. सोमवार २३ जून २०१४ रोजी मी या कंपनीत रुजू झालो व ७ नव्हेंबर २०१४ रोजी कंपनीमधून रजा घेतली.

तसा कार्यकाल फक्त ४ महिने आणि काही दिवसांचा! पण हा वेळ अनेक विविधरूपी आठवणींनी भरलेला होता. Technical आणि developer point of view ने तर बऱ्याच आठवणी आहेत परंतु इतरही काही किस्से सांगण्यालायक आहेत.

Continue reading Mediatech: ४ महिने थोडक्यात

Mediatech: एक अनुभव

वय वर्षे २२. महाविद्यालयीन शिक्षणपूर्ण झाल्यावर वारे वाहू लागतात ते म्हणजे नोकरीचे. आणि आजच्या जगात मनाला हवी तशी नोकरी मिळणे हा तर नशिबाचा भाग. मी कदाचित इतका भाग्यवान नसेन पण त्या काळात नशिबाने मला खरोखरच साथ दिली.

३ जून २०१४. ४ थ्या वर्षाच्या ८ व्या सेमिस्टरचा पेपर झाला. जवळपास college life संपलं असे म्हणण्यास काही हरकत नाही. दुसरा भाग म्हणजे मी काही ‘बेरोजगार’ नव्हतो. College campus मधून TCS मध्ये placement झाली होती. त्यामुळे घरातल्यांचा तसा काही दबाव नव्हता कि अंकुर नोकरीचं बघ म्हणून! TCS आज न् उद्या बोलवेल त्यामुळे तसं काही tension देखील नव्हतं.

Continue reading Mediatech: एक अनुभव