Mediatech: एक अनुभव

वय वर्षे २२. महाविद्यालयीन शिक्षणपूर्ण झाल्यावर वारे वाहू लागतात ते म्हणजे नोकरीचे. आणि आजच्या जगात मनाला हवी तशी नोकरी मिळणे हा तर नशिबाचा भाग. मी कदाचित इतका भाग्यवान नसेन पण त्या काळात नशिबाने मला खरोखरच साथ दिली.

३ जून २०१४. ४ थ्या वर्षाच्या ८ व्या सेमिस्टरचा पेपर झाला. जवळपास college life संपलं असे म्हणण्यास काही हरकत नाही. दुसरा भाग म्हणजे मी काही ‘बेरोजगार’ नव्हतो. College campus मधून TCS मध्ये placement झाली होती. त्यामुळे घरातल्यांचा तसा काही दबाव नव्हता कि अंकुर नोकरीचं बघ म्हणून! TCS आज न् उद्या बोलवेल त्यामुळे तसं काही tension देखील नव्हतं.

पहिले २ – ३ दिवस तसा timepass चालू होता. अन् अचानक एक दिवस social network आणि मित्रांकडून समजलं कि माझ्याच batch च्या २ – ३ जणांना नोकरी देखील लागली. चला ….. चांगलंच झालं. पण जरा विचार केला, आज या मुलांना त्यांच्या नोकरीची इतकी चिंता आहे तर मला का नाही. काही seniors कडून ऐकून होतो कि TCS डिसेंबर शिवाय joining देत नाही. म्हणून विचार केला कि निदान हे ५ – ६ महिने नोकरी करायची आणि एक चांगला अनुभव मिळवायचा.

मुळात मला web development ची बरीच आवड! त्यामुळे यातच नोकरी मिळवायची हाच विचार होता. जिथे मिळेल तिथे, असे मनाला समजवून बऱ्याच ठिकाणी अर्ज केले. अंधेरीपासून कुलाब्यापर्यंत, Bandra पासून पनवेल पर्यंत. काही ठिकाणी email पाठवून देखील अर्ज केला. पहिल्या दोन तीन दिवसात काही उत्तर आलं नाही परंतु ९ तारखेच्या सोमवारी मात्र एक company ने त्या अर्जात interest दाखवला.

९ जून २०१४. बघायला गेलं तर तसा परीक्षा संपल्यानंतरचा हा ६ वा दिवस आणि २० – २५ कंपन्यांमधील पहिली कंपनी जी interest दाखवत होती. Email उघडला, त्यात company ची माहिती आणि interview ची process समजावली होती.

दोन rounds होते. पहिला म्हणजे एक task दिलं होतं, ते घरबसल्या complete करायचं. आणि दुसरा round होता telephonic interview चा. Task अतिशय सोपं होतं, PHP आणि XML वापरून Gallery बनवायची होती. बरीच काळजी घेऊन हे task पूर्ण केलं आणि submit केलं. मनाशी इतकं पक्कं केलं होतं कि जे होईल ते बघून घेऊ अन्हीतर अनुभव म्हणून समजू.

१० जून २०१४. कंपनीकडून पुढील mail आला. Telephonic interview साठी date आणि time confirm केला. १२ जूनला दुपारी interview होईल असे कळविण्यात आले. आणि मग सुरुवात झाली ती म्हणजे interview च्या तयारीला!

सर्वप्रथम job responsibilities पहिल्या. कंपनीला PHP frameworks चे knowledge असणारे लोक हवे होते. परंतु मला फक्त core PHP आणि WordPress बद्दल माहिती होती. असो. जे होईल ते बघू असा विचार केला. PHP ची काही पुस्तके चाळली. कंपनीबद्दल माहिती काढली. सर्वसामान्य interview questions देखील prepare केले. Salary चं विचारलं तर काय बोलायचं हा तर प्रश्न होता. कारण salary किती देणार हे कुठेच सांगितलं नव्हतं. पण जरा विचार केला, नोकरी हातातून घालवण्यापेक्षा कमी पगारात काम केलेलं चांगलं, नाहीतरी TCS ला join व्हायचंच आहे. विचारकरून ठरवलं कि 1.5 – 2.0 L पर्यंत package बोलेन.

१२ जून २०१४. Interview चा दिवस! दुपारी १ वाजता interview होईल असे ठरले होते. मी तयारीतच बसलो होतो. १ वाजता फोने आला खरा. पण सरांनी सांगितलं कि काही कारणाने ते २:३० ला interview घेतील. २:३० वाजता interview चालू झाला. सुजय सरांनी सुरुवात common नव्हे तर uncommon प्रश्न विचारून केली. प्रश्न होता कि, तुझी PHP शी ओळख कशी झाली? यानंतर काही सोपे प्रश्न विचारले. अनेकांची उत्तरे मी बरोबर दिली परंतु एक दोन मात्र चुकले. त्यानंतर त्यांनी कंपनीची ओळख करून दिली.नंतर त्यांनी मला माझे प्रश्न मांडायला संगितले. माझ्या मनात salary चा विचार चालू होता… पण प्रश्न विचारणार कसा?अखेर शेवटी त्यांनीच मला हळू आवाजात विचारले, “How much CTC you are expecting?” मी एकंदरीत interview चा विचार केला. त्यांच्या बोलण्याच्या tone वरून असं वाटत होतं कि ते कदाचित interested नसावेत. परंतु safe side म्हणून मी limit कमी करून बोललो कि 1.0 – 1.5 L. एकंदरीत interview झाला होता, पण ending च्या प्रश्नाचा tone असा होता कि वाटू लागले होते chances कमी आहेत म्हणून. सर बोलले दोन दिवसात result समजेल.

शुक्रवार, १३ जून २०१४. Mediatech कडून फोन आला. मी select झालो होतो. Offer letter वर address टाकण्यासाठी त्यांना address हवा होता.

दोन दिवसात offer letter आले. २३ जून २०१४ पासून join व्हायचे होते. आनंद दुप्पट झाला होता. कारण असे कि आज मला दोन कंपन्यांनी select केले होते. एका company ला भविष्यात join व्हायचे तर एकाला आज पासून.

या offer letter चे वैशिष्ट होते. ते म्हणजे package होते ते 1.62 L चे. पण महत्वाचे म्हणजे काही bond नव्हता. आणि अश्याप्रकारे आवडीची नोकरी पदरात पडली होती.

4 thoughts on “Mediatech: एक अनुभव”

  1. ब्लॉग खूपच मस्त आहे…
    असे आणखी किस्से मराठीत वाचायला मिळतील अशी अपेक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.