Mediatech: ४ महिने थोडक्यात

Mediatech… वडाळा येथे असलेलेली छोटीशी web development कंपनी. ऑफिस antop hill warehouse मध्ये. सोमवार २३ जून २०१४ रोजी मी या कंपनीत रुजू झालो व ७ नव्हेंबर २०१४ रोजी कंपनीमधून रजा घेतली.

तसा कार्यकाल फक्त ४ महिने आणि काही दिवसांचा! पण हा वेळ अनेक विविधरूपी आठवणींनी भरलेला होता. Technical आणि developer point of view ने तर बऱ्याच आठवणी आहेत परंतु इतरही काही किस्से सांगण्यालायक आहेत.

तसा ऑफिस फक्त १० जणांचं पण team अतिशय professional. Project ची quality म्हणजे काय हे मला Mediatech ने शिकवलं. Frameworks ची शक्ती दाखवून दिली. Libraries, assets एकत्र करून कसही best of best web site बनवायची हे मला Mediatech ने शिकवलं. Maintenance हा प्रकार काय असतो अन् code नीटनेटका का ठेवावा हे देखील समजून घेतलं. Late night work कदाचित जास्त वेळा केलं नसेल परंतु development च्या जगातील प्रत्येक गोष्ट कशी हाताळायची हे मला Mediatech ने शिकवलं. एकंदरीत मला future ready बनवून सोडलं.

आठवणीतले किस्से सांगायला गेलं तर … join झाल्यापासूनच दुसऱ्या आठवड्यात आम्ही Mediatech चा ७ वा वाढदिवस साजरा केला. ऑफिस मध्ये का होईना पण party केली. यातून पार्टीची एक वेगळी मजा अनुभवली. इतकच नव्हे तर सरांनी movie ला देखील नेले.

कॉलेजमध्ये lecture ला न बसणं म्हणजे आपण काहीतरी मोठं करतोय असं वाटायचं. परंतु इथे … एक दिवस सुट्टी मारली तर ३०० रुपयांचा फटका बसायचा. सुट्टी घेताना देखील १० वेळा विचार करावा लागायचा. रोज कॉलेजमध्ये ६ तास बसायचा कंटाळा यायचा पण ऑफिस मध्ये दिवसाचा पूर्ण पगार हवा असेल तर ८ तास बसावच लागतं हे समजलं. Deadline च importance ऑफिस life मध्येच समजतं हे देखील तितकच खरं आहे.

काही गोष्टी या रोजच्याच होऊन जातात. रोजचं ९:४८ च्या ट्रेनशी असणारं नातं. रोज २ कधी वाजतात याची मनाला लागलेली ओढ (कारण २ वाजता डब्बा खायला मिळायचा ना!). आणि रोज संध्याकाळी ७ ला तनुज आणि विक्रम सरांसोबत निघून ७:२९ च्या पनवेल ट्रेन साठी केलेली धावपळ. कधी कधी taxi मिळायची पण ट्रेन मध्ये window seat मिळण्याचा आनंद वेगळाच असायचा.

लाईट नसल्याने काम होऊ शकलं नाही असा प्रसंग तसा दोनदाच आला. परंतु लाईट ज्या दिवशी जास्त काम असते त्या दिवशीच जाते हे का म्हटलं जातं हे देखील समजलं.

अशा अनेक किस्स्यांनी Mediatech चा प्रवास झाला. आठवणी बऱ्याच आहेत. ४ चा चहा विक्रम सरांसोबतचा, तनुज सर, विक्रम सर आणि माझा वाढदिवस. आणि बरंच काही!

सांगायला गेलं तर गोष्टी बऱ्याच आहेत… पण संक्षिप्त करून म्हणतो, Office life काय आहे हे Mediatech ने शिकवलं. इतकं मात्र खरं!

One thought on “Mediatech: ४ महिने थोडक्यात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.